Home क्राईम जळगावात पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार

जळगावात पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार

FIR


जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनी येथील रहिवासी तेहतीस वर्षीय गृहिणी रिंगरोडवर त्यांच्या ओळखीच्या कोचुरे कुटूंबीयांचा कुत्रा फिरवण्यासाठी घेवुन गेल्या असतांना गणवेशातील पोलिसाने त्यांना अश्‍लील हातवारे करुन विनयभंग केल्याची तक्रारीवरुन पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिडीत गृहीणीने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, शुक्रवार १२ जून रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील गृहीणी त्यांच्या ओळखीच्या कोचुरे कुटूंबीयांचे पाळीव कुत्रे फिरवण्यासाठी घेवुन गेल्या होत्या. डॉ.गिरीष सहस्त्र बुद्धे यांच्या घरा शेजारुन जात असतांना रस्त्यावर दारुच्या नशेत उभे असलेल्या गणवेशातील दोन पोलिसांनी त्यांच्याकडे बघून हात वारे केले. दुर्लक्ष केल्यावर त्यातील एकाने जबरदस्तीने हात पकडून मोकळ्या जागेत ओढून नेण्याचा प्रयत्न केला.आरडा ओरड केल्यावर मदतीला धावुन आलेल्या पराग कोचुरे, प्रशात ठाकर अशा दोघांनाही या गणवेशातील पोलिसांनी बेदम मारहाण केली. जिल्हापेठ पेलिस ठाणयात फोन केल्यावर पोलिस वाहन आले. मारहाण झालेल्या पराग कोचुरे, प्रशांत ठाकर अशा दोघांना गाडीत बसवुन नेत असतांना विचारणा केल्यावरुन कोचुरे यांच्या आईंना गुन्हा दाखल न करण्याची धमकी पोलिसांनी दिली. तसेच पोलिस ठाण्यात आणल्यावर तक्रार देऊनये म्हणुन पोलिसांतर्फे दबाव आणल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.


Protected Content

Play sound