जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील यांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांचे पुत्र स्वर्गीय निखिल खडसे यांच्या मृत्यू विषयी बेजबाबदार वक्तव्य करत शंका उपस्थित करून वाद उपस्थित केला त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध केला.
जळगाव जिल्ह्याला संस्कृती व परंपरा आहे राजकारणात हेवेदावे , कटकारस्थान किंवा स्पर्धा होत असते. परंतु, यापुढे स्पर्धा विकास कामाची व्हावी आणि विकास कामांवर हा जळगाव जिल्हा पुन्हा पुढे जावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. कुणाबद्दलही वैयक्तिक बोलुन त्याव्यक्तिविषयी विष पेरायच हे महाजन यांनी बंद करावे. जळगाव जिल्ह्यासाठी आलेल्या निधीतून जिल्ह्यातील विकास कामांचे नियोजन करून रस्ते , इतर नागरी समस्या व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे प्रश्न मार्गी लावावेत. वैयक्तिक वाद उपस्थित करून जिल्ह्याच्या राजकीय परंपरेला मलिन करू नये असे मत रविंद्र भैय्या पाटील यांनी व्यक्त केले.
महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी देखील महाजन यांचा निषेध करून त्यांनी नाथाभाऊंशी विकास कामांची स्पर्धा करावी , कै. निखिल खडसे यांच्या पत्नी रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. कै. निखिल यांच्या मृत्यु वेळेस त्याच सोबत होत्या, मग गिरीश भाऊ खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर शंका घेत आहेत का ? असे त्यांनी स्पष्ट करावे . गिरीश भाऊंचे देखील अनेक प्रकरण आहेत, फरदापुरच्या प्रकरणाकडे आम्हाला लक्ष द्यावे लागेल का ? असा सवाल लाडवंजारी त्यांनी महाजन यांना विचारला.
पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाबाहेर गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला चपला, जोडे मारून पुतळ्याचे दहन केले. यापुढे गिरीश महाजन यांनी असे द्वेषपूर्ण वक्तव्य करणे बंद करावे अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील, युवक अध्यक्ष रिकू चौधरी, युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, लिलाधार तायडे, अरविंद मानकरी, अमोल कोल्हे, मझहर पठाण, इब्राहिम तडवी, डॉ. रिजवान खाटिक, दत्तात्रय सोनवणे, प्रतिभा शिरसाठ, सलीम इनामदार, रमेश बहारे, भगवान सोनवणे, अशोक सोनवणे, योगेश साळी, रहिम तडवी, जितेंद्र चांगरे, रफिक पटेल, राहुल टोके, सुहास चौधरी, हितेश जावळे, चंद्रमणी सोनवणे, साजिद पठाण, संजय जाधव, खलील शेख, आरिफ शेख , किरण चव्हाण, भल्ला तडवी, हुसेन खान, वसीम पठाण, युसूफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाग १
भाग २