जळगाव, प्रतिनिधी | पांडे डेअरी चौक येथील डॉ. अॅन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम शिलँडर मेमोरिल अलायन्स चर्च येथे ख्रिस्ती बाधवांचा नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर विश्व शांतीसाठी पार्थना करण्यात आली.
डॉ. अॅन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम शिलँडर मेमोरिल अलायन्स चर्चमध्ये नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार २३ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे २३ डिसेंबर रोजी रेव्हरंट शशिकात एम. वळवी यांच्या उपस्थितीत कॅरलद्वारे प्रारंभ करण्यात आला आहे. आज शनिवर २५ डिसेंबर रोजी रेव्हरंट शशिकात एम. वळवी यांच्या उपस्थितीत सकाळी प्रार्थना व उपासनेस सुरुवात झाली. सुरुवातीस ख्रिस्ती बांधवांनी ख्रिसमस कॅरर्ल्स म्हणजेच नाताळ गीते गायली. यात प्रामुख्याने युवकसंघ व लहान बालके यांचा सहभाग होता. त्यानंतर बायबल वाचन करण्यात आले. विश्वशांती, जागतिक आरोग्य, ओमायक्रोन महामारीतून सर्व मानवजातीचा बचाव व्हावा साठी प्रार्थना करण्यात आली.याप्रसंगी रेव्हरंट. शशिकात एम. वळवी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, येशू शांतीचा अधिपती होता. सुमारे दोन हजार वर्षा पूर्वी सर्व मानवजातीस शांती मिळावी व तारण प्राप्त व्हावे यासाठी बेथलेहेम गावी गायीच्या गोठयात येशूचा जन्म झाला होता. येशूची शिकवण ही सर्व मानवासाठी आहे. त्याच्या शिकवणी नुसार आचरण केल्यास मनाला शांती मिळते. उपासनेनंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना अलिंगण व हस्तोंदालन न करता भारतीय रुढी परंपरेनुसार दोन्ही हात जोडून नमस्कार करुन नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. या नाताळ प्रार्थना सभेत जळगांव शहरातील ख्रिस्ती समाज बहुसंखेने उपस्थित होता. नाताळ उत्सव यशस्वीतेसाठी सचिव प्रा.विनय गायकवाड, पचं सदस्य प्रकाश शिंदे, एस.बी.गावीत, नितीन मकासरे, अनिल मसीदास, संजय पारधनी, सौ एलिझबेथ वळवी आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मीता पारधनी, पवन गवांदे, अमोल देशपांडे, किरण देशपांडे,संदीप कसोटे, रेवती कसोटे प्रणाली बनसोडे,तसेच युवक संघ व संडेस्कुल आणि महिला संघाचे प्रमुख यांचे सहकार्य लाभले.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1028953934319206
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1088188765262714