जळगाव (प्रतिनिधी) गुजराल पेट्रोल पंप परिसरात दीपक मधुकर बनसोडे (रा़ बांभोरी) या तरूणासह त्याच्या मित्राला तीन तरूणांनी बेदम मारहाण केल्याची घटना १५ रोजी दुपारी ४:३० वाजता घडली होती़ मारहाण करणाºया त्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची जामिनावर सूटका झाली आहे़.
दीपक बनसोडे हा मित्रासह बांभोरी येथून इलेक्ट्रीक साहित्य घेण्यासाठी जळगाव शहरात आला होता़. दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंप परिसरातील इलेक्ट्रीक दुकानाजवळ आल्यानंतर हेमांशू राजपूत, सचिन चव्हाण व भोला भोई (सर्व रा़ पिंप्राळा) या तिघांनी दीपक व त्याच्या मित्राला काही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़. त्यानंतर बेदम मारहाण करून पळ काढला़. याप्रकरणी दीपकच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़. जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, मारहाण करणारे हेमांशू राजपूत, सचिन चव्हाण व भोला भोई या तिघांचा शोध घेवून अटक केली़. दरम्यान, त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील नाना तायडे, अविनाश देवरे, हेमंत तायडे, प्रवीण भासले यांनी आरोपींना पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली होती.