जळगाव प्रतिनिधी । ट्रकचालकासह क्लिनरला चाकूचा धाक दाखवित तसेच मारहाण करत लुट केली होती. या घटनेतील नितीन अनिल ननवरे (वय-20) रा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे तांबापूरा, विजय सुनिल पारधे (वय-20), आणि आश्विन यशवंत सोनवणे (वय-20) सर्व रा. तांबापुरा या संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले. न्या. प्रीती श्रीराम यांनी संशयितांची कारागृहात रवानगी केली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून टमाट्याने भरलेला ट्रक जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत असतांना रस्त्यात दुचाकी आडवी लावून चाकूचा धाक दाखवित ट्रकचालकासह क्लिनरला लुटल्याची सिनेस्टाईल घटना 9 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्याचा अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी छडा लावुन एक अल्पवयीन संशयितांसह तिघांना अटक केली होती. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेेश बारी यांनी तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले. गुन्ह्यात संशयितांकडून चोरी केलेले 600 रुपये, चाकू व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.