जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त असुन, नाईलाजास्तव लॉकडाऊन वाढल्याने हातमजूरांचे दोन वेळच्या जेवणांचे अडचण निर्माण झाली आहे. याचाच शहरातील जेसीआयतर्फे शाहु नगर भागात खरोखरच गरीब व गरजु व काही अपंग कुटुंबीयांना मंगळवार १५ एप्रिल २०२० रोजी किराणा सामानाचे वाटप केले. यात गव्हाचे पीठ, तेल, तुर दाळ, मीठ, मिरची, मसाला, हळद, साबण, अशा जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
जेसीआय एक मोठी आंतरराष्ट्रीय संघटना असुन, वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम संस्था घेत असते. कोरोना सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात आपल्या ड्युटीवर अहोरा़त्र भुमिका बजावणार्या शहरातील सर्व पोलीस कर्मचार्यांना जेसीआय बदाम लस्सीचे वाटप केले होते, त्यानंतर समता नगर, हरीविठ्ठल नगर, खंडेराव नगर या भागात केळी वाटप करण्यात आले होते. १२ क्विंटल केळीचे वाटपसुध्दा संस्थेने केले होते, त्यानंतर गोलाणी मार्केट मध्ये अत्यावश्यक सेवेसाठी येणार्या बांधवांसाठी सॅनीटायझर, साबण, पाणी असा उपक्रम घेतला. यासाठी माजी अध्यक्ष प्रतिक शेठ यांचे सहकार्य लाभले.
कोरोनामुळे गरजुंना सामान वाटप करतांना जेसीआय जळगांवचे अध्यक्ष जेसी शरद मोरे (माळी), सचिव – जेसी प्रमोद गेहलोत आदी उपस्थित होते, तसेच सागर पोळ, सुशिल चौधरी, सुनिल टेकावडे आदींचे सहकार्य लाभले. सोशल डिस्टन्सींचा वापर करुन हे वाटप करण्यात आले. गरजुंच्या चेहर्यावर आनंद प्रकर्षाने जाणवत होता.