जळगाव प्रतिनिधी । शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकिस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश सोमनाथ हिरे वय 26 असे मृत तरुणाचे नाव आहे. निलेश याचे आई वडील तसेच भाऊ मनोज हिरे हे गिरणा पंपिंग रोड परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान निलेश याचा फेब्रुवारी २०२० मध्ये विवाह झाला. त्यानंतर तो पत्नीसह अनुराग स्टेट बॅक कालनीत भाड्याने रूम करून राहत होते. नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री जेवण करून दाम्पत्य झोपून गेले. आज सकाळी साडेसात वाजेपुर्वी निलेश यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला. पत्नीने ही घटना पाहिल्यानंतर आरडाओरड केली. त्यानंतर शेजारील नागरिकांनी धाव घेतली. ही घटना कळल्यानंतर कुटूंबासह नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला.
या घटनेची खबर मयताचा भाऊ मनोज याने रामानंदनगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसानी घटनास्थळी धाव घेत निलेश याला शासकीय रुग्णालयात हलविले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील करीत आहेत.