जळगाव प्रतिनिधी । येथील वैद्यकीय रूग्णालयात कोरोनाची संशयित म्हणून दाखल झालेली ६८ वर्षाच्या महिलेचा आज सायंकाळी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
वैद्यकीय रूग्णालयात कालच एक ६८ वर्षाची महिला रूग्णालयात दाखल झाली होती. तिला श्वास घेण्यासाठी अडचण येत होती. तिच्या नमुन्याला धुळे येथील केंद्रात कोरोनाच्या चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. अद्याप तिच्या चाचणीचा अहवाल प्रलंबीत आहे. या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र सायंकाळी साडेचारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे. आता अहवाल आल्यानंतरच तिला कोरोनाची लागण होती की नाही याबाबत माहिती मिळणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००