Home Cities जळगाव जळगावात कॉ. ए. बी.बर्धन यांना स्मृतीद्नानिमित्ताने अभिवादन

जळगावात कॉ. ए. बी.बर्धन यांना स्मृतीद्नानिमित्ताने अभिवादन

0
27


 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष कॉ. ए. बी.बर्धन उर्फ भाई बर्धन यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. २ जानेवारी रोजी संघटनेचे जळगाव परिमंडळ तर्फे प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले.

कॉ. ए. बी.बर्धन उर्फ भाई बर्धन वीज कामगार संघटनेचे सरचिटणीस, शेतकरी, कष्टकरी, संघटीत व तो असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी संपूर्ण आयुष्य धगधगत्या यज्ञकुंडासमान व्यतीत केले. ते माजी खासदार व कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस होते अशी माहिती कॉ. विरेंद्रसिंग पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केली. तसेच बर्धन साहेब कुशल संघटक,दूरदर्शी नेतृत्व व उत्तम वक्ते होते असे मत त्यांनी मंडेल. याप्रसंगी केंद्रीय महिला कार्यकारिणी सदस्या कॉ. संध्या पाटील , सर्कल अध्यक्ष जळगाव कॉ. दिनेश बडगुजर विभागीय अध्यक्ष जळगाव कॉ. प्रभाकर महाजन, कॉ.हेमंत बारी, कॉ.विठ्ठल तायडे, कॉ. दिलीप बाविस्कर, कॉ. सागर पाथरवट, कॉ. समाधान पाटील, कॉ.राहुल बावनकर, कॉ.राहुल साळुंखे, कॉ. मनोज जिचकार, कॉ. हेमंत राठोड, कॉ.गणेश शेंडे उपस्थित होते.


Protected Content

Play sound