जळगाव प्रतिनिधी । येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित शहरी बेघर निवारा केंद्रात निवासी लाभार्थीना कोरोना व्हायरसपासून बचाव होण्याठी मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी निवासी लाभार्थ्यांना कोरोना संदर्भात विषयावर संपूर्ण माहिती व घ्यावयाची काळजी शासन माहिती पुस्तिकानुसार प्रकल्पप्रमुख दिलीप चोपडा यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मास्क व सनिटायझर वाटप करण्यात आले आणि उपस्थितांना स्वच्छतेची माहिती देऊन कोरोना हटवण्यासाठी शपथ घेतली. याप्रसंगी व्यवस्थापक मनोज कुळकर्णी, काळजीवाहक चेतन हिवरे, राजेंद्र मराठे उपस्थित होते.