जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस शहर व जिल्ह्यात वाढत असून शहरातील असोदा रस्त्यावरील वाल्मिकनगर पक्की चाळ परिसरात एक रुग्ण कोरोना बाधीत आढळून आल्याने प्रशासनाने तो परिसर ‘कंटेंनमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे.
काल सायंकाळी पत्र्याच्या साहाय्याने रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला असून तेथे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्या परिसरात कोणी आत व बाहेर जाऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान महापालिकेतर्फे फवारणी करण्यात येऊन खबरदारी घेतली जात आहे.