जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात शहरातील वाईन्स शॉपच्या सिल असलेल्या गोदामांची मद्यसाठ्याची तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ॲड. कुणाल पवार यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची लागू करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्व मद्याची दुकाने बंद करण्यात आले आहे. या काळात दुकाने, गोदाम सील असतांना दारू विक्री करणाऱ्या अमळनेर येथील दुकानांची चौकशी करून गुन्हे दाखल केले आहे. मात्र जळगाव शहरात अशी चौकशी का? करत नाही. कुणाच्या दबावाला आपण बळी पडत आहेत का ? असा प्रश्न देखील या पत्रात नमूद केला आहे. तरी शहरातील वाईन शॉप व गोदामांची तात्काळ तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलीअसल्याचे एका प्रसिद्धी पत्रकान्वय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर सचिव कुणाल पवार यांनी केली आहे.