जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दाणाबाजारातील भुसार मालाचे होलसेल दुकान फोडून रोकडसह धान्याची चोरी केल्याचा प्रकार आज सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील पोलन पेठ, दाणाबाजारातील भुसार मालाचे होलसेल विक्रेता मे. केशरीमल रामदयाल राठी यांचे दुकान आहे. संचारबंदी असल्यामुळे त्यांनी आपले दुकान गेल्या आठवड्यापासून बंद ठेवले आहे. दुकानाचे मालक राजेश नंदलाल राठी (वय-५०) रा. दिक्षीत वाडी यांनी ३० मार्च रोजी दुपारी दुकान बंद केले होते. आज सकाळी त्याचे बंधू मनिष राठी यांनी सकाळी १०.३० वाजता दुकान उघडले. त्यावेळी दुकानातील कामगार नितीन वाणी दुकानात साफसफाईचे काम करत असतांना दुकानाच्या मागच्या बाजूला असलेले लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा निघालेला दिसून आला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानात शिरून दुकानातील कॅशीयर ड्रावर मधून ११ हजार रूपयांची रोकड लंपास केली तर धान्याची काही पोते व भुसार माल चोरून नेल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे दुकानात ब्रिटीशकालीन लोखंडी लॉकर होते. ते देखील उघडण्याचा प्रयत्न केला.या लॉकरचा लोखंडी हॅण्डल तोडून टाकले. मात्र लॉकर उघडले नाही. सर्व सामान अस्तवस्त करून टाकला होता. घटनेची माहिती मनिष राठी यांनी तातडीने शनीपेठ पोलीसांनी घटनेची माहिती कळविली. शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून चोरी केलेल्या मालाचा पंचनामा केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शनीपेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००