जळगाव प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आज १३ जानेवारी रोजी कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
शाळेत ऑनलाईन पद्धतीने चित्रकला व हस्तकला शिकून विद्यार्थ्यांनी सुंदर कलाकृती तयार केल्या. ऑनलाईन शिकवण्याचा व शिकण्याचा विद्यार्थी आणि शिक्षकांनी मनापासून आनंद घेतला. त्याचीच फलश्रुती म्हणजे हे ‘कलाप्रदर्शन’ संस्कृत या विषया अंतर्गत विद्यार्थांनी संस्कृत भाषेतील नाटिका व गीत यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. याची मूळ संकल्पना व मार्गदर्शन मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांनी केले. या कलाप्रदर्शनासाठी चित्रकला शिक्षक पूनम दहिभाते, देवेंद्र कोल्हे, हस्तकला शिक्षक तारामती परदेशी, तुषार पुराणिक तसेच संस्कृतसाठी मीना मोहकर यांनी कलाप्रदर्शनाचे नियोजन केले. यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/234737108255193