जळगाव प्रतिनिधी । जळगावची खंडित विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळाले असून पुढील महिन्याच्या मध्यावर याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

जळगावात मोठा गाजावाजा करून विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र सुरवातीचे काही दिवस वगळता विमानसेवा सुरूच झाली नाही. अर्थात या सेवेचा पूर्णपणे फियास्को झाला आहे. या पार्श्वभूमिवर, फेब्रुवारी महिन्यात विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानसेवा पुरवणार्या कंपन्या, केंद्रीय खात्याचे अधिकारी व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठक झाली. यात जळगाव व सिंधुदुर्ग याठिकाणाहून विमानसेवा सुरू करण्यावर चर्चा झाली. यामुळे आता तरी सुरळीतपणे विमानसेवा सुरू होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



