जळगाव प्रतिनिधी । कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात जिल्हा प्रशासनाने आज मंगळवारपासून पुढील सात दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश आहेत. पहिल्याच दिवशी एमआयडीसी पोलिसांनी कंजरवाड्यात धाड टाकुन अवैध दारु, रसायन नष्ट केले.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी दुपारी १२ वाजता सिंगापुर कंजरवाडा येथ्ज्ञे छापा मारला. यावेळी शितल रमेश माचरेकर (वय ३९, रा.राजीव गांधी नगर, जुनी जोशी कॉलनी) हिच्या घरातून २४ हजार रुपये किमतीचे गावठी दारु तयार करण्याचे रसायन मिळुन आले. २०० लिटरच्या तीन टाक्यांमध्ये हे रसायन ठवले होते. पोलिसांनी हे रसायन जागेवरच नष्ट केले. नरेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन शितल माचरेकर हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल वंजारी, हर्षवर्धन सपकाळे, मुदस्सर काझी, इम्रान सय्यद यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. यासह पोलिसांच्या पथकाने कंजरवाड्यातील अनेक घरांमध्ये तपासणी केली.
https://www.facebook.com/watch/?v=1169490380081588