जळगावच्या खटल्यात मनसेचे राज ठाकरेंसह तिघांची निर्दोष मुक्तता; जिल्हा न्यायालयाचा निकाल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज,प्रतिनिधी । उत्तर भारतीयांना मारहाणप्रकरणी २००८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणाच्या खटल्याचे शुक्रवारी ११ फेब्रुवारी जळगाव जिल्हा न्यायालयात काम काज झाले. यात राज ठाकरेंसह इतर चार जणांना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, याच्या निषेधार्थ उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनसेने आंदोलन उपसले होते. मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते. जळगावात मनसे पदाधिकाऱ्‍यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अँड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज यांना १५ हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती. दरम्यान, सुनवाईअंती आज शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी जळगाव न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात मनसेच्या वतीने अॅड. संदीप पाटील यांनी कामकाज बघितले.

Protected Content