Home Cities जळगाव जळगावचे एस.पी. बदलले; डॉ. प्रवीण मुंडे नवीन पोलीस अधिक्षक

जळगावचे एस.पी. बदलले; डॉ. प्रवीण मुंडे नवीन पोलीस अधिक्षक

0
30

जळगाव प्रतिनिधी । डॉ. पंजाबराव उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. प्रवीण मुंडे हे जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत.

जळगावचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची बदली होणार असल्याचे संकेत आधीच मिळले होेते. कोरोनामुळे बदल्या स्थगित करण्यात आल्याने याबाबत निर्णय झाला नव्हता. यानंतर पोलिस अधिकार्‍यांच्या दोनदा बदल्या झाल्या असल्या तरी जळगावचा निर्णय झाला नव्हता. अखेर आज रात्री डॉ. उगले यांच्या जागी आयपीएस अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound