Home क्राईम जयकिसनवाडीत लॅपटॉपसह मोबाईलची चोरी – शहर पोलिसात गुन्हा दाखल

जयकिसनवाडीत लॅपटॉपसह मोबाईलची चोरी – शहर पोलिसात गुन्हा दाखल

0
41

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी । शहरातील जयकीसनवाडी येथील संजीवनी अपार्टमेंटमधील घरातून लॅपटॉप आणि मोबाईल असा एकुण ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मनोज रामकृष्ण झोपे (वय-५३) रा. संजीवनी अपार्टमेंट, जयकीसनवाडी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वकीलीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार १८ मार्च रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घसून घरातील ३० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप आणि ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकुण ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मनोज झोपे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून १८ मार्च रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. विजय निकुंभ हे करीत आहे.


Protected Content

Play sound