जम्मू-काश्मीर : १० जिल्ह्यामध्ये कॉलिंगसह एसएमएस सेवा सुरु

j k mobile

 

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावर निर्बंध कायम राहणार आहेत. प्रशासनाने आता प्रीपेड सिम कार्डवरील व्हाईस आणि एसएमएस सेवा सुरू केली आहे.

कलम ३७० रद्द आल्यानंतर त्याचा फायदा सांगण्यासाठी तसेच केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारमधील ३६ मंत्री जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मीरचे प्रिंसिपल सेक्रेटरी कन्सल यांनी याची माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्व स्थानिक प्रीपेड सिम कार्ड्सवरील व्हाईस कॉल आणि एसएमएस सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. तसेच जम्मूमधील १० जिल्ह्यातील पोस्टपेड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बडगाम, गंडरबल, बारानमुला, श्रीनगर, कुलगाम, अनंतनाग, शोपियान आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा तुर्तास बंद राहणार आहे. जम्मू-काश्मीरमधील मोबाइल सेवेबद्दल माहिती देताना कन्सर यांनी सांगितले की, शनिवारपासून गुरुवार पर्यंत ३६ केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी याविषयीची माहिती दिली होती.

Protected Content