नवी दिल्ली (वृत्तसंस्था) करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजधानी दिल्लीत ५० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा नियम शाहीन बाग येथील आंदोलकांना देखील लागू असेल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषेद घेतली. यावेळी केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीतील सर्व जिम, नाईट क्लब्स आणि स्पा देखील ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय यांपैकी कुठल्याही कारणासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामधून केवळ लग्न समारंभ वगळण्यात आले आहेत. दरम्यान, शाहीन बागमधील आंदोलकांना देखील हा नियम लागू असेल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.