पाचोरा प्रतिनिधी । पिंपळगाव हरेश्वर येथील जन्मदात्या पित्याने पोटच्या दोन मुलींना शेतातील विहीरीत ढकलून देत क्रुर हत्या करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलींना काय खाऊ घालू ? या विचारातून आलेल्या नैराश्यातून या माणसाने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी विकास सुरेश ढाकरे हा आज सकाळी मोठी मुलगी तनुश्री विकास ढाकरे (वय-१२) आणि परी उर्फ शिवन्या विकास ढाकरे (वय-४) यांना सोबत घेवून शेतात बकर्यांना चारा घेण्यासाठी जवखेडा शिवारात गेला होता. दरम्यान, या शिवारात असणार्या अरविंद केशवराव शिंदे यांच्या शेतातील शेतात विहीरीजवळ आल्यानंतर विकासने आपल्या पोटच्या दोन्ही मुलींना विहीरीत ढकलून दिले. आणि स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही मुलींची बुडून मृत्यू झाला असला तरी विकास ढाकरे याचा जीव मात्र वाचला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले.
या दुर्घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विकास ढाकरे याने हे टोकाचे पाऊल नेमके कसे उचलले ? याबाबत पूर्ण माहिती अद्याप मिळाली नाही. तथापि, पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन्ही मुलींना काय खाऊ घालू?, त्यांचे लग्न कसे होईल ? यामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचे संशयित आरोपी विकास ढाकरे यांनी सांगितले. दोन्ही मुलींचा मृतदेहा नागरीकांच्या बदतीने विहीरीतून बाहेर काढण्यात आले. दोघाचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले आहेत. तर विकास ढाकरे याला अटक करून त्याच्यावर खुनाचे कलम लावण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००