जळगाव, प्रतिनिधी । जळगाव येथील कोटा क्लास येथे जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या प्रमुख संयोजनात रक्तदान शिबिर व विनामूल्य ॲन्टीजन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता कोल्हे माळी होत्या.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांनी केले. जनमत प्रतिष्ठानच्या नेतृत्वात घेतलेल्या शिबिराच्या आयोजनात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह यांचे सहकार्य मिळाले. मान्यवरांचे स्वागत पोलीस सेवा महिला संघटना जिल्हाध्यक्षा हर्षाली पाटील व प्रतिभा मेटकर यांनी केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा रक्तपेढीचे ज्येष्ठ डॉ. ए. डी. चौधरी, टेक्निशियन किरण बाविस्कर व रूपाली बडगुजर सहकारी राहुल पाटील यांचा सत्कार महापौर जयश्री महाजन व सरिता कोल्हे माळी यांच्या हस्ते झाला. प्रस्तावना,सुत्रसंचलन पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेविका निता सोनवणे,महर्षि वाल्मिक बहुउद्देशीय संस्थेचे विवेक सोनवणे, अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी, कुमूद प्रकाशन संचालिका संगिता माळी यांचे मार्गदर्शन मिळाले. शिबिरास राहुल कोळी, सागर कोळी , कोटा क्लासेसचे राजेंद्रकुमार वर्मा सर,संजयकुमारसिंग सर,विजय पाटील सर मान्यवर उपस्थित होते.आभार संतोष भारंबे यांनी मानले.