मुंबई (वृत्तसंस्था) विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुकारलेल्या जनता कर्फ्यूला जनतेचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पण, हा जनता कर्फ्यू एका आठवड्यापूर्वीच पुकारायला हवा होता. दोन्ही सरकारचे मते भिन्न असू शकतात, पण माझ्या वयक्तित मताप्रमाणे, हा कर्फ्यू लागू करण्यास थोडा उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत दिली आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना राउत म्हणाले की, देशात गोमांस खाणाऱ्यांना किंवा भारत माता की जय म्हनणाऱ्यांना मारण्याऐवजी, एकमेकांना मदत करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोबत यायला हवे. कोविड -19 चा पार्दुर्भाव वाढणार आहे. याचा परिणाम येत्या काही काळात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. सध्या देशातील लाखो लोक आपला घरात कैद झाले आहेत, रस्ते निर्जन दिसत आहेत, वाहनांची संख्याही रस्त्यावर कमी दिसत आहे. लाखो लोक आपला घरात कैद झाले आहेत, रस्ते निर्जन दिसत आहेत, वाहनांची संख्याही रस्त्यावर कमी दिसत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुकारलेल्या जनता कर्फ्यू एका आठवड्यापूर्वीच पुकारायला हवा होता,असेही राऊत म्हणाले.