Home अर्थ छोट्या व्यावसायिकांना मिळणार अपघात विम्याचे कवच

छोट्या व्यावसायिकांना मिळणार अपघात विम्याचे कवच

0
30

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकार लवकरच छोट्या व्यावसायिकांना १० लाखांपर्यंतच्या अपघात विम्याची मोफत सुविधा जाहीर करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपुर्वी मोदी सरकार लघु व्यावसायिकांना आकृष्ट करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आता मिळाले आहेत. या अनुषंगाने सरकार देशभरातील छोट्या व्यावसायिकांसाठी अपघात विमा योजना आणण्याचा विचार करत आहे. या विम्याची रक्कम १० लाखांपर्यंत असू शकते. यासाठी किरकोळ प्रीमियम भरावा लागेल. जीएसटीत नोंदणीकृत असलेल्या व्यापार्‍यांनाच योजनेचा लाभ मिळेल.

सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान विम्याप्रमाणे ही अपघात विमा योजना असेल. या योजनेत १२ रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांच्या अपघात विम्याचे सुरक्षा कवच मिळते. ही योजना १८ ते ७० वयोगटातील लोकांसाठी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound