छेडखानी करणाऱ्या तरूणाला दोन्ही बहिणींनी बसमध्येच बदडले

busbadlate

जळगाव प्रतिनिधी । महिन्याभरापासून पाठलाग करून छेडखानी करणाऱ्या तरूणाला दोन्ही बहिणींनी आज चालत्या बसमध्ये चांगलाच चोप दिला. एवढेच नव्हे तर, बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणत त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले.

याबाबत माहिती अशी अशी, नूतन मराठा महाविद्यालयात तिसऱ्या वर्षांला शिकत असलेली विद्यार्थींनी म्हसावद ता.जि.जळगाव येथून लहान बहिणीसोबत दररोज ये-जा करते. दरम्यान गावातील तरूण शब्बीर शहा भुरा शहा (वय-२८) रा. म्हसावद हा गेल्या महिन्याभरापासून या विद्यार्थींनीचा पाठलाग करत होता. आज सकाळी शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जळगावात आल्या होत्या. सकाळी १० वाजता नवीन बसस्थानक येथून दोघी बहिणी जळगाव-म्हसावद बसमध्ये बसल्या. त्यावेळी शब्बीर शहा भुरा शहा (वय-२८) रा. म्हसावद हा तरूणीही बसमध्ये तरूणीच्या बाजूला बसला. हे पाहुन विद्यार्थीनी तरूणाजवळून उठून बसच्या मागच्या सीटवर बसली. पुन्हा शब्बीर शहा हा विद्यार्थींनीच्या बाजूला बसला. हे सर्व असह्या झाल्याने विद्यार्थींनी आणि तरूणासोबत वाद झाला. तोपर्यंत बस इच्छादेवी चौफुलीवर आली. दोघांचा वाद सुरू झाल्याने बस चौफुलीवर थांबली. त्यानंतर दोन्ही बहिणींनी तरूणाला चांगला चोप देत बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. छेडछाडप्रकरणी तरूणाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले असून याप्रकरणी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content