Home Cities जळगाव छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली

0
38

जळगाव प्रतिनिधी । स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली.

काव्यरत्नावली चौकातून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, नेहरू पुतळा, टॉवर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सांगता झाली. रॅलीत आमदार सुरेश भोळे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, मनोज मोहिते, विठ्ठल पाटील, अभिषेक पाटील, अ‍ॅड. सचिन पाटील, विजय देसाई, पीयूष पाटील, केतन पाटील, सुदाम पाटील, आकाश साळुंखे, शुक्राम पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. ही दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आली. येथे वीर जवानांची आठवण म्हणून रॅलीत उपस्थितांनी मेणबत्ती प्रज्वलित करत शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound