छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर

 

123123

जळगाव, प्रतिनिधी । झेप प्रतिष्ठान बुलंद छावा मराठा युवा संघटना, भारतीय भष्ट्राचार निवारण समिती, ए.एस ग्रुप, मनसे, माधवराव गोळवलकर रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार १९ फेब्रुवारी रोजी शिवतिर्थ मैदानावर,कोर्ट चौक येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असंख्य रक्तदात्यानी रक्तदान केले. उदघाटन महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर अश्र्विनभाऊ सोनवणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी अविनाश पाटील, संदिप पाटील, संदिप मांडोंळे, परशुराम सपकाळे, आकाश साळुंखे,मनोज लोहार,प्रसाद गायके,शुभम सुर्यवंशी, इत्यादीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामकाज पाहिले.

Protected Content