जळगाव, प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात प्रतिमापूजन करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
नेहरू युवा केंद्रा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम अधिकारी अजिंक्य गवळी, स्वयंसेवक चेतन वाणी, आकाश धनगर, गौरव वैद्य, शाहरुख पिंजारी आदी उपस्थित होते.