छत्रपती शिवरायांची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करा; शिवसेनेची मागणी

पारोळा प्रतिनिधी । अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटक येथील काही समाजकंटकांनी केलेले असून त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पारोळा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

 

शिवसेना पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटक येथील काही समाजकंटकांनी केले. तसेच कर्नाटक राज्याचे भाजपाचे मुख्यमंत्री यांनी ही घटना छोटी असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा पारोळा शहर शिवसेना वतीने जाहीर निषेध करण्यात आला. अश्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन पोलीसांना देण्यात आले आहे. याप्रसंगी पारोळा शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, माजी शहरप्रमुख बापू मिस्‍तरी, रमेश महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप चौधरी, युवा सेना शहरप्रमुख आबा महाजन, युवा सेना उपशहर प्रमुख, सावन शिंपी युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक माळी, पंकज मराठे, ईश्वर पाटील, बापू मराठे, बाळू पाटील, कुंदन पाटील, कैलास मराठे, दिपक शिंपी इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

Protected Content