जळगाव राहूल शिरसाळे । महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शहरातील १६ व्यापारी संकुलांमध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज शहरातील चौबे मार्केटमधील दुकानदारांनी घंटानाद आंदोलन केले आहे.
महापालिका प्रशासन गाळेधारकांकडून अवाजवी बिल आकारणी करत असून याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यानुसार आज चौबे मार्केट मधील गाळेधारकांनी महापालिका प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी गाळ्यांच्या शेडवर चढून घंटानाद आंदोलन केले. या गाळेधारकांकडे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसून योग्य ती भाडे आकारणी केल्यास गाळेधारक भरण्यास तयार असल्याचेही या आंदोलकांनी मत व्यक्त केले आहे. या आंदोलनात अमित गौड, योगेश बारी, हरिहर कुंठे, बाबूलाल जैन, निलेश महाजन, वासिम काझी, सुनील जगताप, अमित बावनानी, सागर बारी, स्वप्नील सिनकर, विजय सोनजे, मनीष बजाज, जावेद शेख आदी सहभागी झाले होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3838933302891382