Home क्राईम चौघुले प्लॉट परिसरात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या

चौघुले प्लॉट परिसरात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या

0
36


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनी पेठ परिसराच्या चौघुले प्लॉट भागात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका संशयित आरोपीला आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अटक केली. संशयित आरोपीविरोधान शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी मिलिंद शशिकांत दलाल उर्फ बबलु (३२, रा.चौघुले प्लॉट, शनी पेठ) हा राहत असलेल्या परिसरात हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती माहिती शनी पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली होती. त्यावरुन हवालदार दिनेशसिंग लोटू पाटील, अभिजित लक्ष्मण सैदाणे, राहूल पाटील, राहूल घेटे, संदीप माने, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून मिलिंद याला तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound