Home क्राईम चौगुले प्लॉट परिसरातून तरूणाच्या दुचाकीची चोरी

चौगुले प्लॉट परिसरातून तरूणाच्या दुचाकीची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चौगुले प्लॉट परिसरातून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन पांडुरंग पवार (वय-३२) रा.चौगुले प्लॉट, रेल्वे पुलाजवळ, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. १२ जून रोजी रात्री ९.३० वाजता चेतन पवार यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ बीटी ९१३०) ही घरासमोर पार्किंग लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १३ जून रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आला. चेतनने दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक योगेश माळी करीत आहे.


Protected Content

Play sound