जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसर आणि आयोध्या नगर परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या ४ संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी ७ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. यातील दोन जण हद्दपार असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनूसिंग रमेश राठोड (वय-२३), प्रशांत उर्फ चोरबाप्या पुंडलिक साबळे (वय-२८) दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव, समीर शेख फिरोज शेख (वय-२१, रा, फातिमानगर) आणि समीर खान अफसर खान (वय-१८, रा. मेहरून, जळगाव) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
रविवार ७ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात आणि आयोध्या नगर परिसरात चोरीच्या उद्देशाने काही संशयित आरोपी फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत रात्री सोनूसिंग राठोड, प्रशांत साबळे, समीर शेख फिरोज शेख आणि समीर खान अफसर खान या चौघांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे, मुदस्सर काझी, पोलीस कॉन्स्टेबल ललित नारखेडे, किरण पाटील, सतीश गर्जे यांनी केली आहे.