चोरीच्या उद्देशाने घरात घुसला ; महिला एकटी असल्याचा फायदा घेत केला बलात्कार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करणाऱ्या चोराने वकील महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत चाकूचा धाकावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना दिल्लीच्या जंगपुरा येथे घडली आहे. दरम्यान, सोनू नामक आरोपीला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे.

 

पोलीस चौकशीत आरोपी सोनूने सांगितले की, त्याने चोरीच्या उद्देशाने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला होता. जेव्हा त्याने महिलेला एकटे पाहिले तेव्हा त्याने बलात्कार केला. बलात्कारानंतर आपण महिला वकिलाची गळा आवळून हत्या केली. वास्तविक बघता गळा आवळल्याने पिडीत महिला फक्त बेशुद्ध पडली होती. परंतू महिला मृत असल्याचा आरोपीला भास झाला आणि त्यानंतर महिलेचे डेबिट कार्ड, घरात ठेवलेली रोकड व काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन आपण फरार झाल्याचे सोनूने सांगीतले. दरम्यान, पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Protected Content