चोपडा : वार्ताहर । पोलिओ निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे चोपड्यातील डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस तसेच बूथ वरील कर्मचारी यांचा आज २४ऑक्टोंबर रोजी जागतिक पोलिओ दिना निमित्त रोटरी क्लबकडून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते पोलिओ निर्मूलन जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चंद्रकांत बारेला यांचा सत्कार रोटरी क्लब अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केला सोबत अजय जयस्वाल, नदीम शेख फरीद, पल्लवी देशमुख, गजानन करंदीकर, श्रीमती आरती कापुरे (आशा सेविका) श्रीमती दिव्या गोसावी (आशा सेविका) आदींचा पोलिओ निर्मूलनासाठी उत्कृष्ट सेवाकार्य केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
रोटरी ही 200 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि भौगोलिक क्षेत्रातील 34,000 पेक्षा जास्त रोटरी क्लबच्या 1.2 दशलक्ष सदस्यांना जोडते. त्यांचे कार्य स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांचे जीवन सुधारते, समाजातील गरजू कुटुंबांना पोलिओमुक्त जगासाठी मदत करते.
1985 पासून, रोटरीने १२२ देशांमधील दोन अब्जाहून अधिक मुलांच्या संरक्षणासाठी जवळपास १.२ अब्ज डॉलर्स आणि असंख्य स्वयंसेवक तासांचे योगदान दिले आहे. अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये हा आजार कायम आहे.
या कार्यक्रमासाठी सचिव रुपेश पाटील, पंकज बोरोले, अनिल अग्रवाल, विलास कोष्टी, चंद्रशेखर कोष्टी, प्रकाश पाटील, शिरीष पालीवाल, डॉ अमोल पाटील, अरुण सपकाळे, प्रदीप पाटील, निखिल सोनावणे, अर्पित अग्रवाल, चेतन टाटीया, गौरव महाले, पृथ्वीराज राजपूत, शशिकांत पाटील, धीरज अग्रवाल व मनोज पाटील हे .रोटरी सदस्य उपस्थित होते.
रोटरी चे वरिष्ठ सदस्य एम डब्लू पाटील यांनी रोटरीचे पोलिओ निर्मूलन मधील योगदान या बद्दल माहिती दिली आभार प्रदर्शन सचिव रुपेश पाटील यांनी केले.