चोपड्यातून ३० परप्रांतीय मजुरांना घेऊन दोन बस रवाना

चोपडा प्रतिनिधी । मुंबई हून ट्रक मध्ये प्रवास करून चोपड्यात आलेल्या मध्यप्रदेशातील मजूराना आज संध्याकाळी दोन बसेस मध्ये मध्यप्रदेशच्या सीमेवर चोरवड येथे पाठविण्यात आले

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार स्थलांतरित मजुरांसाठी विनामुल्य बसेस पाठविण्यात यावे असा आदेश आज रोजी प्राप्त झाला. दरम्यान, मुंबईवरून काही कामगार आज ट्रकमधून आल्याचे पोलीसांना दिसून आले. या अनुषंगाने तहसीलदार अनिल गावित यांनी डेपो मॅनेजर संदेश क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधून दोन बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघा बसला सॅनिटायझरने निर्जंतुक करून एका बस मध्ये एका सिटवर एक प्रवाशी या सोशल डिस्टिंगचा नियम पाळत प्रवाश्यांना बसविण्यात आले. यावेळी या मजुरांची मेडिकल चेकिंग, सॅनिटायझर करून, त्यांना बिस्कीट पुडे, पाणी बॉटल, नमकीन पॉकेट, असा खाऊ ही देण्यात आले या दोन्ही बसवर आर.जी.बोरसे,एस.एम.पाटील,चालक म्हणून गेले आहेत. ही बस संबंधीत प्रवाशांना चोरवडा (ता. रावेर) येथील सीमेवर पोहचवणार आहे.

यावेळी महसूलचे लियाकत तडवी, प्रदीप बाविस्कर, जितेंद्र धनगर, राजेंद्र पाटील, प्रशांत विसावे तसेच ए. टी. पवार,डी. डी. चावरे, अनिल बाविस्कर, संभाजी पाटील, बी.एस.सुर्वे, सागर बडगुजर, बजरंग महाजन आदी हजर होते.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content