चोपडा येथे रोडीओ रोबो देणार वाहतूक सुरक्षेचे धडे

chopda1

चोपडा प्रतिनिधी । एसपी रोबोटिक्स वक्सस, चेन्नईतर्फे समुदायातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला “रोडीओ रोबो देणार वाहतूक सुरक्षेचे धडे”
मेकर लॅब गॅलेक्झी कॉम्प्यूटर एज्युकेशन, चोपडा या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मेकर लॅबने रोटरी उत्सवात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघण्यासाठी ‘रोडीओ’ या नावाने प्रचलीत असलेला भारतातील पहीला वाहतूक नियंत्रित करणारा रोबो आणला आहे.

चोपडा शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या सुरक्षा विषयक धडे देण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२० (मंगळवार) रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरपरिषदेचे सीईओ अविनाश गांगोडे, चोपडा ग्रामीण सपोनि संदीप आराक, राष्ट्रवादीचे गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक गजेंद्र जैसवाल, गॅलेक्झी कॉम्प्यूटर एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष नीतीन शाह, प्रिती शाह, श्रेयस मुजुमदार (रोबोटिक्स विभाग प्रमुख), राहुल माथुर (एस.पी.आर.डब्ल्यू. महाराष्ट्र प्रमुख) आणि वाहतूक पोलीस श्री. बच्छाव यांचा उपस्थितीत सादर करण्यात आला व रोबोद्वारे वाहतूक नियंत्रण करतानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमात रोबोटिक्स शिकणाऱ्या विद्यर्थ्यांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

“रोडीओ” रोबो एस पी रोबोटिक्स मेकर लॅबच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन स्वत: बनविला आहे, त्याचे वजन जवळपास ८० किलो आहे व हा रोबो मोबाईल अॅप आणि ब्लु-टूथ च्या सहाय्याने नियंत्रित केला जातो. ह्या रोबोच्या हातात रस्ते सुरक्षा चिन्हाचे फलक दर्शविण्यात आले असून दर्शनी भागात दिसणाऱ्या स्क्रीनवर सुरक्षित वाहतुकीचे संदेश दिले जाणार आहे. आणि या रोबो द्वारे चोपड्यात विविध ठिकाणी वाहतूक नियम पाळण्याबद्दल ची जनजागृती केली जाणार आहे. एस पी रोबोटिक्स मेकर लॅब, चोपडामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात “रोबोटिक्स” शिक्षणाच्या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी केले गेले. अधिक माहीतीसाठी https://sproboticworks.com/ या संकेत स्थळावर भेट द्या किंवा १८००-१२१-२१३५ / +91 98903 78274 या क्रमांकावर फोन करा.

Protected Content