Home आरोग्य चोपडा येथे रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबीर

चोपडा येथे रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबीर


चोपडा प्रतिनिधी । देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास तातडीने रक्त उपलब्ध व्हावे म्हणून महाराष्ट्र दिनानिमित्त रोटरी क्बल ऑफ चोपडा व भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्बल ऑफ चोपडा व भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे ताराचंद जैन रक्तपेढी हॉल येथे शुक्रवार १ मे रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबीराला चोपड्याचे तहसीलदार अनिल गावित यांचे मार्गदर्शन लाभले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
शिबीर यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन जैन, सचिव धिरज अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ. वैभव पाटिल, डॉ. प्रफुल्ल पाटिल , भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष क्षितीज चोरडीया, विभागीय सदस्य लतिष जैन व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. रोटरीचे जेष्ठ सद्स्य एम.डब्लू.पाटील, व्ही.एस.पाटील, दिलीप जैन आदींनी भेट दिली होती. ताराचंद जैन रक्तपेढी चे अनमोल सहकार्य मिळाले.


Protected Content

Play sound