चोपडा, प्रतिनिधी | येथिल संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबाराचे २०० अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा, श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संतांचे ज्येष्ठ नागरिक संस्था चोपडा व दादासाहेब डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महात्मा गाँधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन भाषणात अॅड. संदीप पाटील बोलताना म्हणाले की, कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व कर्मचारी यांनी जनतेची फार सेवा केली. आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक जण खऱ्या अर्थाने देवदूत होते. आजच्या या शिबिरात गोदावरी फाऊंडेशन आणि तेली समाजाच्या संस्था यांनी जनतेचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबाबत अभिनंदन केले. यावेळी अॅड. संदीप पाटील यांच्या हस्ते डॉ.शुभम भोलने व गोदावरी फाऊंडेशनचे उपस्थित सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे नेते डी.टी. चौधरी, जगतराव पाटील यांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. या दोघांनी ज्येष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठांच्या सेवेत या संस्था कायम काम करीत असल्याने त्यांनी संस्थाचालकांना धन्यवाद दिले. यावेळी संताजी जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश श्रावण चौधरी, सचिव नारायण पंडित चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठांचा सन्मान व सत्कार करून ज्येष्ठ नागरिक दिवसही यावेळी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज भूषण टी. एम. चौधरी यांनी केले. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हा तेली समाजाचे नेते भागवत माणिक चौधरी प्रदेश अध्यक्ष सरकारी कर्मचारी महासंघ, निर्मला रामचंद्र चौधरी प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा, प्रशांत सुरेश सुरडकर प्रदेश तेली महासंघ नाशिक विभाग युवक महासंघ कार्याध्यक्ष, रामचंद्र शेठ चौधरी जिल्हा व्यापारी तेली महासंघाचे नेते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिबिरात २०० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये विशेषता डोळ्यांचे व गुडघे आजाराचे रुग्णांची संख्या अधिक दिसून आली या शिबिरात ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ गोदावरी फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. प्रदेश तेली महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, ह .भ.प. गोपीचंद महाराज यांनी सूत्रसंचालन केले . यशस्वीतेसाठी महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान अध्यक्ष देवकांत के. चौधरी, जितेंद्र प्रकाश चौधरी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला खासकरून मधुकर बाविस्कर, रमेश तात्या शिंदे ,अशोक साळुंके ,नंदकिशोर सांगोरे, प्रकाश शंकर चौधरी, श्रीराम मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.