चोपडा येथे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

chopada news

चोपडा, प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात आज (दि.१०) ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०१९-२०’ चे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे उदघाटन डॉ.प्रमिला विश्वास पाटील (सचिव, जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे) यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै.ना. सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थी व संगीत विभाग प्रमुख किशोर खंडागळे यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, प्रमुख पाहुणे डॉ.प्रमिला पाटील (सचिव, जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे), मा.योगेश पाटील (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव), प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ.उमवि, जळगाव), कार्यकारी मंडळ सदस्य सुरेश सीताराम पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य माजी प्राचार्य डी.बी.देशमुख, गव्हर्निंग कौन्सील सदस्य शर्मिलाताई जैन, गव्हर्निंग कौन्सील सदस्य राजाराम पाटील, नरेंद्र शिंदे, के.डी.चौधरी, प्रा.श्यामभाई गुजराथी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ समिती प्रमुख डी.पी.सपकाळे व एस.पी.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले. त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ समिती प्रमुख डी.पी.सपकाळे यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन एस.पी.पाटील यांनी केले.

याप्रसंगी वर्षभरात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून पदवी व पदव्युत्तर विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी, क्रीडा, एन.एस.एस., एन.सी.सी या विभागात राष्ट्रीय, राज्यस्तरावर तसेच विद्यापीठस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राहुल निकुंभ या विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते २०१९-२० या वर्षीचा ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.एस.ए.वाघ व डी.एस.पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक, गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content