चोपडा, प्रतिनिधी | येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लालबावटा शेतमजूर युनियन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक भा.क.प. व इतर समविचारी पक्षांतर्फे प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकांचे वाचन करण्यात आले.
सर्वप्रथम भाकपाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन लक्ष्मण शिंदे, बापूराव वाणे, इंदुबाई पाटील, जियाओद्दीन काझी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. नंतर कॉलेज विद्यार्थिनी ममता साळुंखे यांनी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी यांना राज्यघटनेची उद्देशिका वाचून शपथ दिली.
या कार्यक्रमाला युवराज साळुंखे भरत शिरसाट, दिलीप साळुंखे, दिवाणजी साळुंके, आम आदमी पार्टीचे रईस खान, पत्रकार हाजी उस्मान शेख, नदीम शेख, महेंद्र मराठे, वंचित आघाडीचे समाधान सोनवणे, मतीन शेख, उषाबाई भराडी, शांताबाई साळुंखे, सुनिता पाटील, सखुबाई पाटील, चंद्रकला पाटील, मंगला साळुंखे, उषाबाई भिल्ल, मीना साळुंखे ,सविता पाटील ,बाबुराव शिरसाठ, आदी उपस्थित होते.