चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील भाकप व लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे येथे १८ फेब्रुवारी मंगळवारी सकाळी ११ वाजता केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प सार्वजनिक उद्दोग क्षेत्रे विक्री करणारा महागाईस प्रोत्साहन देणारा असल्याने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
निवेदनात या आहेत मागण्या
नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर कायदे अल्पसंख्यांक निर्धन दलित आदिवासी भटके लोकांना याविरुद्ध तसेच जाचक आहेत. त्याचा निषेध त्याचप्रमाणे विधवा निराधार वयोवृद्ध शेतमजुरांना विविध थकीत मानधन मिळावेत त्याच प्रमाणे मैत्रईयी ठेवीदारांचे पैसे मिळावे. हातेड खुर्द येथील गरजूंच्या प्लॉट मोजणी मिळावेत. घरपट्टी कमी कराव्यात.. घरकुलांचे चेक मिळावेत बचत गटांना दहा लाख कर्ज मिळावे.. मागेल त्याला रेशन कार्ड मिळावे.. अन्नसुरक्षा मिळावी आदी मागण्यांसाठी बस स्थानक समोर ऑफिस जवळून मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात शेतकरी शेतमजूर यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाकपचे नेते अमृत महाजन, गोरख वानखेडे, शिवाजी बोरसे, वासुदेव कोळी, पांडुरंग माळी, सुनील पाटील, सलमान तडवी, छोटू पाटील, वैशाली साळुंखे, शांताराम पाटील, वना माळी, धोंडू पाटील, सूर्यभान बारेला, रतिलाल भिल, आशाबाई पाटील, विश्वास पाटील, रईस खान, जियाउद्दिन काजी आदींनी केले आहे.