Home Cities चोपडा चोपडा येथे तापी सुतगिरणीतर्फे कोरोना योध्दा एस.बी.पाटील यांचा सत्कार

चोपडा येथे तापी सुतगिरणीतर्फे कोरोना योध्दा एस.बी.पाटील यांचा सत्कार


चोपडा प्रतिनिधी । येथील तापी सहकारी सूतगिरणीच्या वतीने संचालक तथा सुकाणू समितीचे सदस्य एस.बी.नाना पाटील यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.

एस. बी. पाटील यांनी कोरोना महामारी विरोधात कोविड सेंटर ऊभारणे, त्यात ऑक्सिजन पुरविणे यापासून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती करून जनसेवेच्या माध्यमातून शासनाला मदत करण्याचे भरीव काम केले. ज्याचा आदर्श ईतर जिल्ह्य़ांनी घेतला. स्वताचा जीव धोक्यात घालून एस. बी. पाटील यांनी कोरोना ग्रसित लोकांना आधार देण्याचे महान कार्य केले आहे. ते खऱ्या अर्थाने योद्धा असल्याचे प्रतिपादन संचालक के. डी. चौधरी म्हणाले.

त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला. संस्थेचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पी. बी. पाटील, संचालक माधवराव ऊत्तमराव पाटील, भागवत पाटील, तुकाराम पाटील, रामदास चौधरी, प्रकाश रजाळे, राजेंद्र पाटील, जागृती बोरसे, रंजना नेवे, जनरल मॅनेजर विजय पाटील, अकाउंटंट सुकुमार काळे व सूतगिरणीचे कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound