चोपडा प्रतिनिधी । येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या उच्च माध्यमिक विभागातील कला, शास्त्र, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण आदी सर्व शाखांमधून विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले आहे. या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील कला शाखेचा निकाल एकूण ८०.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९६.५ टक्के, शास्त्र शाखेचा निकाल १०० टक्के तर व्यवसाय शिक्षण शाखेचा निकाल ८४ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व्ही.सी. गुजराथी, चेअरमन राजाभाई मयुर, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माननीय माधुरीताई मयूर, चांद्रहासभाई गुजराथी सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक डी. व्ही. याज्ञीक, उपमुख्याध्यापक आर.आर. शिंदे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य जे.एस. शेलार, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, पर्यवेक्षक जी.वाय. वाणी, आर.बी. पाटील विविध विद्याशाखांचे पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विभागनिहाय यशस्वी विद्यार्थी
कला विभाग – प्रथम क्रमांक भिल चंद्रकला प्रल्हाद (82.77%), द्वितीय: पाटील कल्याणी सत्यसिंग (79.85%)
वाणिज्य विभाग – प्रथम क्रमांक चौधरी मयूरी बाबूलाल(79.69), द्वितीय क्रमांक पाटील लक्ष्मी रविंद्र(79.23)
शास्त्र विभाग – प्रथम क्रमांक चौधरी वैष्णवी संजीव(82.31), द्वितीय क्रमांक साळी दर्शना गोपाल(80.77)
व्यवसाय शिक्षण विभाग – प्रथम क्रमांक सोनार मंगेश प्रमोद(69.38), द्वितीय क्रमांक मोरे विशाल प्रकाश(64.15)