चोपडा प्रतिनिधी । शहरातील इनरव्हील क्लबच्या वतीने कोरोना संकट काळात उपाययोजना व दक्षता व्हावी यासाठी तालुक्यातील वेले येथील अनाथाश्रमातील बालकांना व वृद्धाश्रमातील वृद्ध मंडळींना सॅनिटायझर किट वाटप करण्यात आले.
कोरोना संकटकालीन उपाययोजना म्हणून हॅण्ड वॉश, मास्क व इतर महत्वपूर्ण साहित्य समाविष्ट असलेल्या किट्सचे वाटप इनरव्हील क्लबच्या प्रांत व्हाईस चेअरमन अश्विनी गुजराती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
क्लबच्या वतीने अध्यक्ष शैला सोमाणी, सचिव अंकिता जैन, पूनमबेन गुजराती, माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू, किरण पालिवाल, सीमा पाटील आदींनी ह्या किट्सचे वाटप केले. याप्रसंगी अनाथाश्रम व वृद्धआश्रमातील सर्व लाभार्थी, कर्मचारी वृंद, श्वेता नेवे, निलेश चौधरी, प्रवीण माळी व इतर सदस्य उपस्थित होते.
उपस्थित सर्वांना कोरोना पर्वात आरोग्य जागृतीविषयी माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू यांनी मार्गदर्शन करून सविस्तर माहिती दिली. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे सांगत त्यांनी कोरोना रुग्णाला चांगली वागणूक देऊन माणुसकीचे दर्शन घडवावे, असेही आवाहन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.