चोपडा प्रतिनिधी । अहमदाबाद येथून पश्चिम बंगाल येथे पायी जाणाऱ्या ४५ मजूरांना अक्कलकुवा प्रशासनातर्फे मोफत बस उपलब्ध करुन दिली. बस चोपडा बसस्थानकात आगमन झाल्यानंतर सर्वांसाठी प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
अहमदाबाद येथे काम करणारे व पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेले ४५ मजूर हे पायदळ अक्कलकुवा येथे पोहचले, तेथील प्रशासनाने त्याची दखल घेत मोफत बस उपलब्ध करून दिली. त्यांना गोंदिया जाण्यासाठी सकाळी 11 वाजता बस मार्गस्थ झाल्या. तेथील प्रशासनाने आपले तहसीलदार गावित साहेब, गटनेते जीवन चौधरी यांचे संपर्क साधून त्यांची संध्याकाळची जेवणाची इच्छा दर्शवली. गटनेते संध्याकाळचे जेवण देण्याची तयारी दर्शवली. सदर बस ८.४० वाजता चोपडा बसस्थानक येथे आगमन झाले. त्यावेळी जिवन चौधरी, आगार व्यवस्थापक क्षिरसागर साहेब, तहसील कार्यालयाचे लियाकत तडवी, संरक्षण अधिकारी प्रतिक पाटील, तालुका पेसा समन्वयक प्रदिप बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते सगर बडगुजर, साई भोजनालयचे कर्मचारी, उपस्थित होते. यावेळी जिवन चौधरी यांनी जेवणाची व्यवस्था केली, तर सागर बडगुजर यांनी मिनरल पाणी बॉटलचे वाटप केले. सर्व मजुरांनी केलेल्या व्यवस्थाबाबत प्रशासनाचे आभार मानले.