चोपडा तालुक्यात बेघरांना घरे देण्याची शिवसेनेची  मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

चोपडा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावे यासाठी चोपडा तालुक्यातील शिवसैनिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दिरंगाई केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

१५ रोजी दुपारी १२ वाजता माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा नेतृत्वाखाली चोपडा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी बी एस कासोदे यांना एक निवेदन दिले त्यात सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागात सर्व बेघर कुटुंबांना राहण्यासाठी घर असावे याकरता केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये शासकीय जमिनीवरील जानेवारी २०११ पर्यंतची निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण करून राहण्याचऱ्या सर्व अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी तुम्ही सदस्य सचिव म्हणून ठोस पावले उचललेली नाहीत व तशा ग्रामीण भागातून प्रत्येक गावातून तक्रारी आमच्याकडे येत आहेत तुमच्या अशा कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या योजनेच्या प्रभावी अंमल होताना दिसत नाही व या योजनेच्या लाभापासून गरजू व पात्र लोकांना आपण वंचित ठेवले आहे. तरी तात्काळ या योजनेच्या संबंधितांच्या अहवाल एक महिन्याच्या आत आमचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचेकडे सादर करावा अन्यथा आपल्याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील. असे म्हटले आहे.
यावेळी उपसभापती एम व्ही पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, ऍड एस डी सोनवणे हे उपस्थित होते. या निवेदनावर चोपडा तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील , तालुकाप्रमुख मंगला पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख ,नरेश महाजन, गटनेता महेश पवार, नगरसेवक महेंद्र धनगर, ऍड शिवराज पाटील, विजय पाटील, संजीव शिरसाठ, प्रताप पावरा, दिपक चौधरी, जितेंद्र कोळी आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content