चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा येथील ग्रामपंचायतीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरपंच अनिता राठोड यांच्या हस्ते जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी सरपंच अनिता दिनकर राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, राजेंद्र चव्हाण, पदम तवर, गोरख राठोड, रघुनाथ राठोड, कैलास राठोड, अभी राठोड, खिमा राठोड, माजी चेअरमन दिनकर राठोड यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.