*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीत १४ वित्त आयोगातून एकूण १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे लोकार्पण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले असून शासन निर्देशानुसार जि.प. शाळेत सीसीटीव्ही बसविणाऱ्या त्या तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायत ठरल्या आहेत.
तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने १४ वित्त आयोगाच्या निधीतून व चौक सुशोभीकरण अंतर्गत गावात एकूण १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तत्पूर्वी शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद शाळांसह अंगणवाडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणाऱ्या त्या तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायत ठरल्या आहेत. एकीकडे शासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवाहन करण्यात येत असताना त्यापूर्वीच चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने केलेली कामगिरी हि कौतुकास्पद आहे. याचे लोकार्पण आ. मंगेश चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते शनिवार रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे चोरी व गैरकृत्याचे प्रमाण आटोक्यात येणार असून चोरट्यांवर अंकुश ठेवता येणार असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण व गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहेत. दरम्यान २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचा पत्र पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. या पत्रावर लागलीच कृती करून चैतन्य तांडाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यावेळी ग्रामपंचायतीच्या शासकीय इमारत बांधण्यासाठी सुमित घनश्याम शर्मा यांनी पाच गुंठे जमीन निःशुल्क दिली आहे. त्यांचा सन्मान आ. मंगेश चव्हाण यांनी केला. यावेळी संगणक अभियंता गुणवंत सोनवणे, सहायक बिडीओ माळी, ग्रामसेवक कैलास जाधव, भाजपाच्या नमो ताई, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.